राज ठाकरे हे राजकीय गुंड : अबू आझमी

अबू आझमी

नागपुर: राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षामुळेच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप अबु आझमी यांनी नागपुर विधानसभा परिसरात बोलताना केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र गुंडनिर्माण सेना आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते हॉकर्सला मारून हाकलत आहेत. ते कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. सरकारला त्यांना पूर्वीच बसू घायला नको होते. ते २५ वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. सरकारने त्यांच्या रोजगाराचा बंदोबस्त करावा. बिहार, उत्तर प्रदेश येथील कोर्टाचे समन्स असतानाही राज ठाकरे कोर्टात हजर होत नाहीत. हॉकर्सप्रकरणी सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अबू आजमी यांनी केली.Loading…
Loading...