कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांची चौकशी सुरू

टीम महाराष्ट्र देशा :- कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज हे आता ईडीच्या कार्यालयात पोहोचले असून बंद दरवाज्याआड त्यांची चौकशी सुरू झाली आहे. ईडीचे अधिकारी राणा बॅनर्जी हे राज ठाकरे यांची चौकशी करत आहेत.

त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे हे देखील असून ते नजीकच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तसेच बंद दरवाज्याआड राज ठाकरे यांची गेल्या 1 तासापासून त्यांच्या चौकशीला सुरूवात झाली आहे.

Loading...

राज ठाकरे यांची कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांना ताब्यात घेतले, मनसे पदाधिकाऱ्यांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण