मुंबई : करोना कालखंडानंतर दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडतोय. राज ठाकरेंनी यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच आज सकाळपासून मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते.
तसेच काही महिन्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तर अजित पवार यांची नक्कल केली. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं, राज ठाकरेंना काही रुचलेलं नाही, असं राज यांच्या बोलण्यातून दिसून आलं.