राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटकारले

भाजपच्या ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वारंवार मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी खासदार नाना पाटोले यांनीही मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. मोदी उत्तर न देता फक्त खासदारांना प्रश्नच विचारत सुटतात असे त्यांनी म्हटले होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याचा दाखला देत राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारले आहे.

Rohan Deshmukh

भाजपच्या ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा
मोदींच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात नरेंद्र मोदी, अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. मोदी हे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्याला ‘माझे मत पटतंय का?’ असे दरडावून विचारताना दिसत आहेत. या व्यंगचित्रात नितीन गडकरी यांना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. राज ठाकरेंनी रेखाटलेले हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...