अनेक वर्षांपासून राज ठाकरे पोटतिडकीने मांडत आहेत ‘हा’ प्रश्न, राज्य सरकारने आता घेतला निर्णय

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात येणाऱ्या परप्रांतियांची माहिती ठेवावी अशी मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे सत्ताधाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. पण आता साकीनाका घटनेनंतर राज्यकर्त्यांचे डोळे उघडल्याचे दिसत आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे राज्यातील परप्रांतीयांची नोंद होणार आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात परप्रांतीय कोठून येतात, ते कोठे वास्तव करतात याची कोणतीच माहिती नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवे अशी मागणी राज ठाकरे यांनी सतत केली होती. कालांतराने तो मुद्दा बाजुला पडला. परंतू साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.

‘माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हटले आहे.

तसेच शक्ती कायद्यात काही सुधारणादेखील करण्यात येणार आहे. महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये. असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पोलिसांना आता इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल. शिवाय आता प्रत्येक रिक्षा चालकाला स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक परप्रांतीयांची नोंद राज्यातील पोलीस यंत्रणेकडे असणार आहे.

महत्वाच्या बातम्या