fbpx

‘राज ठाकरेंना ‘लुख्खा’ म्हणणाऱ्या निरुपमांंना मतदान करण्याची वेळ मनसे कार्यकर्त्यांवर’

sanjay nirupam & raj thackeray

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ या भाषेत हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे, अशी खरमरीत टिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज, रविवारी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर केली.

राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुध्द केलेली टीका भाजपला चांगलीच झोंबली आहे. याच टिकेला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, कालच्या मेळाव्यातील भाषणासाठी राज ठाकरे यांनी जसे कष्ट घेतले ते आधी घेतले असते तर, आज दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वतःचे इंजिन आता बंद पडले ते सध्या दुसऱ्याला लावून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत मोदी – शहा यांना हद्दपार करण्याचा संकल्प मनसे मेळाव्यात केला आहे. यासाठी निवडणूक न लढविता महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. एकदा मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला. आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या. असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.