fbpx

ईडीची नोटीस, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ आदेश

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे मनसेने आंदोलनाचे हत्यार उचलत सरकारवर टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून २२ तारखेला कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या आहे. त्यांचा आपण आदर केला आहे. त्याचप्रमाणे याही नोटीसीचा आपण आदर करूयात अस आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

तसेच २२ ऑगस्टला कुणीही शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही असं वर्तन करू नका. कृपया शांतता राखा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच या दिवशी इडीच्या कार्यालयाजवळ येऊ नका असंही ठाकरे म्हणाले आहेत. तसेच याविषयी योग्य वेळ आल्यावर मी बोलेन असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.