मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कात टाकत एका नवी सुरवात केली आहे. काल (ता. २३ ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या महाअधिवेशनात अनेक ठराव मांडण्यात आले. याचवेळी त्यांनी बारामतीच्या एका कार्यकर्त्याला संघटना बांधणीची जबाबदारी दिली आहे.

बारामती येथील नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. सुधीर पाटसकर आणि वसंत फडके यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हे दोन पदाधिकारी येणाऱ्या काळात आपल्याला त्रास देतील,’ अशा मिश्कील शब्दात संघटना बांधणीची जबाबदारी देत असल्याचे मेळाव्यात जाहीर केले.

Loading...

दरम्यान, राज्यात एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बारामतीचे महत्त्व राजकीय पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यातच मनसेने महाअधिवेशनाच्या निमित्ताने आपला झेंडा बदलल्याने आता मनसे एक नवे राजकीय वळण घेणार हे देखील निश्चित झाले आहे.

दरम्यान, सेनेच्या स्थापनेपासूनच सुधीर पाटसकर हे राज ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेत त्यांच्यावर आता संघटनात्मक बांधणीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . त्यामुळे मनसेच्या पटलावर देखील बारामतीतील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार