मुंबई : सध्या राज्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांमधील पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं असेल. त्याचबरोबरच काल रात्रीच निवडणूक आयोगाने कोणत्या गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याबाबत निर्णय जाहीर केला आहे. यासगळ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. तर दुसरीकडे मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येतं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
आगमी निवडणूकांचं वारं हळूहळू राज्यात घुमू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. येत्या आगामी निवडणूका मनसे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं समजतं आहे. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर करत, तयारीला लागा, असे आदेशही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु असंही ते म्हणाले. तसंच सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा असं सांगत त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, असंही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सहा ‘एम’चा फॉर्म्यूला दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स या सहा ‘एम’वर लक्ष केंद्रीत करण्यास पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
तसेच, दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडले नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसंच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Urfi Javed | बोल्ड अंदाजासह ‘उर्फी जावेद’चे नवीन गाणे रिलीज
- Kishori Pednekar | ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या…
- Kishori Pednekar | उषःकाल आतापासून सुरू झाला; चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
- Upcoming Vivo Mobile | लवकरच होणार Vivo ची ‘ही’ मोबाईल सिरिज लाँच
- Ravi Rana | उद्धव गटाला मिळालेलं नाव ‘उद्धव काँग्रेस सेना’ ; रवी राणांचा ठाकरेंवर निशाणा
- Aravind Sawant। “आता मशालीची धग सहन करा”; बाळासाहेब ठाकरे यांचं ३८ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हा