‘मी मास्क घालतच नाही’, असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच

raj thackeray

पुणे – सरकारकडून सतत कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जाता. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्यास सांगितले जाते. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे याला अपवाद आहेत. ते नेहमीच कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मात्र पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी चक्क मास्क घातला होता.

संपूर्ण दौऱ्यात विनामास्क असलेले राज ठाकरे या भेटीदरम्यान मास्क घालून बसले होते. यावेळी राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. या भेटीदरम्यान मी मास्क घालतच नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या राज ठाकरेंनी मास्क लावलेला होता.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लेखाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. बाबासाहेब पुरंदरे पुढील आठवड्यात वयाची 99 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांचे वयोमान आणि कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP