राज ठाकरेंना साहित्यातील काय कळत का ?

केरळ तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील साहित्यिक समाजात घडणाऱ्या घटनांवर ठाम भूमिका घेतात. मात्र अशावेळी महाराष्ट्रातील साहित्यिक गप्प का असतात? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. दरम्यान राज ठाकरे याचं वक्तव्य चुकीचे असून त्यांना साहित्यातील काय कळते असा खोचक टोला बडोदा येथे होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लगावलाय.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण आवाज उठवला होता, तसेच समाजात घडणाऱ्या प्रश्नांवर लेखन केल आहे. त्यामुळे मराठी साहित्यिक भूमिका घेत नाहीत असे म्हणणे चुकीचे असल्याच देशमुख म्हणाले. तसेच यावेळी देशमुख यांनी मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

सांगली जिल्ह्यातील औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या भूमिकेवर बोट ठेवले होते.

You might also like
Comments
Loading...