राज ठाकरेंनी ‘चला हवा येउ द्या’ बघायला हरकत नाही- भाजप

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदींची नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलाखत झाली.त्यावरून विरोधकांंकडून जोरदार टीका टिपण्णी झाली.त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही व्यंगचित्रातून टीका मोदींवर हल्ला चढवला होता.आता त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलंं आहे.

राज ठाकरेंनी वेळ घालवण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ बघायला हरकत नाही.अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंंची ट्वीट करून  खिल्ली उडवली आहे. ‘लोकांच्या प्रश्नांपेक्षा “मी”पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात,त्यांना प्रथम राष्ट्र! मग पक्ष !आणि शेवटी मी !!अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजण थोड अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!!’ असा चिमटा काढला आहे.