मराठा क्रांती मोर्चा : राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

raj thakrey and maratha kranti morcha

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असून ते आज बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, ऐन वेळी दुपारी हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. द हिंदू या वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मराठा क्रांती मोर्चा : उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक

मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण आहे. पुढील दोन दिवसांमध्ये ते परभणी, हिंगोली, बीड, लातूर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार होते मात्र आता हे मेळावे देखील होतील की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.

मराठ्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका – धनंजय मुंडे

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती  करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.