fbpx

‘माझे असत्याचे प्रयोग’, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा मोदींवर फटकारे

raj thackeray painting on gandhi jyanti

वेबटीम: आज देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती साजरी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटले आहे. ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जाहीर सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधणाऱ्या राज यांनी व्यंगचित्रातूनही मोदींवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रात महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आले आहे. यामध्ये गांधींच्या हातात ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. तर महात्मा गांधींच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या हाता ‘माझे असत्याचे प्रयोग’ अशा नावाचे पुस्तक देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी र्र्ज यांनी मोदींवर टीका करत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धादांत खोटे बोलतात. एवढ खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही’ असे म्हणाले होते. या व्यंगचित्राच्या माध्यमातून हेच दर्शवण्याचा प्रयत्न राज यांनी केल्याच दिसत आहे.