पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा झाली. यावेळी त्यांनी औरंगजेबच्या औरंगाबाद येथील थडग्यावरून चाललेल्या राजकारणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. अस जोरदार टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाहीये. कारण महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं. अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?; उद्धव ठाकरेंच्या सभेवर राज ठाकरेंचा पलटवार
- “अयोध्याबाबतच्या प्रतिक्रिया ट्रॅप होता-सापळा होता, मला अडकायचं नव्हतं”; राज ठाकरेंच स्पष्टीकरण
- निवडणूका नाहीत उगाच भाषण भिजत कशाला ; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
- “जिथे माझे कारसेवक मारले गेले त्यांचे..”, राज ठाकरेंनी सांगितले अयोध्या दौऱ्यामागील कारण
- “मटणकरी नाही, तो तर थ्री इडियट्स मधला सायलेन्सर”, ‘मनसे’चा अमोल मिटकरींवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<