२०१३ साली राज ठाकरेंनी सुशीलकुमार शिंदे यांची ‘अशी’ उडवली होती खिल्ली

raj thakrey and sushilkumar shinde

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता राज्यभरात दहा सभा घेण्याची घोषणा केली आहे. मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत थेट आघाडीला पाठींबा न देता भाजपला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार करत आहेत. ठाकरेंची १५ एप्रिल रोजी एक सभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. प्रकाश आंबेडकर आणि भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीने कोंडी झालेल्या कॉंग्रेसला राज यांच्या सभेने आशेचा किरण मिळण्याची शक्यता आहे.

मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून आता मागच्या निवडणुकीत मोदींवर स्तुतिसुमने उधळणारे राज ठाकरे आता त्यांच्यावर रोज टीका करत सुटले आहेत. ठाकरे यांनी आता रंग बदलला असून ज्या आघाडीच्या नेत्यांवर ते भ्रष्ट असल्याचे आरोप करत होते आता थेट त्याच नेत्यांना आणि आघाडीला मदत होईल अशी भूमिका घेऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, २०१३ साली राज ठाकरेंनी सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत सुशीलकुमार शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. शिंदे यांनी दलितांसाठी काय केलं ? असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी शिंदेंची मिमिक्री देखील केली होती. दरम्यान, याच सभेत मोदींची ठाकरे यांनी तोंडभरून स्तुती देखील केली होती. याच सभेत ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना मोदी जे रोज सकाळी अंघोळ करतात ना, त्याचे दोन – दोन चमचे पाणी प्या असा खोचक सल्ला देखील दिला होता.

२०१३ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अशी डागली होती शिंदेंवर तोफ

‘सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर सतत एकच, मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं एकच तुणतुणं सुरू… मला सोनिया मॅडमनी हे दिलं, एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं अहो सुशीलकुमार तुम्ही काय केलं दलित बांधवासाठी?’ असं म्हणत शिंदे यांच्यावर शरसंधान केले होते.

‘त्या दिल्ली रेप प्रकरणातील त्यांना प्रश्न विचारलं तरी तेच मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं अरे काय प्रश्न विचारला तुम्हांला उत्तर काय देतायेत…’ असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांची नक्कल करीत त्यांची खिल्ली देखील उडवली….

सोलापुरातील सिग्नल

‘आज मला सांगितलं शहरात फक्त ६ सिग्नल सुरू आहे, याला काय शहर म्हणायचं?’ या शहरासाठी काय केलं सुशीलकुमारांनी असा सवालही त्यांनी त्यांना विचारला होता.