देशात सध्या मोडी लिपी नाही तर मोदी लिपी दिसत आहे, राज ठाकरेंचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : देशात सध्या मोडी लिपी फारशी दिसत नाही. त्यावर कोणी कामही करताना दिसत नाही. आता देशात फक्त मोदी लिपी दिसत आहे. असा सणसणीत टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लागावला आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अच्युत पालव यांच्या कामाचं कौतुक केलं.

राज म्हणाले की, ‘अच्युत पालव यांचं लेखन अतिशय सोपं वाटतं. मात्र ते काम सुरू केल्यावर त्यातल्या अडचणी समजतात. त्यामागे त्यांची कित्येक वर्षांपासूनची मेहनत आहे आणि ती मेहनत मी सुरुवातीपासून पाहतोय, असे कौतुकोद्गार राज यांनी काढले.

Loading...

आपल्या लेखणीबद्दल बोलताना त्यांनी राज यांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे मोडी लिपीत स्वाक्षरी करायचे, अशी आठवणदेखील त्यांनी सांगितली. तसेच तुम्ही कॉम्प्युटरवर कितीही काम करा. शेवटी ओरिजनल ते ओरिजनलच, अशा शब्दांत राज यांनी शुद्धलेखनाचं महत्त्वदेखील सांगितलं. माझं अक्षर बरं आहे, याचं श्रेय माझ्या वडिलांना आणि बाळासाहेबांना जातं, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.

सुंदर अक्षर असणं यासारखं दुसरं समाधान नाही. तुम्ही केलेलं लिखाण, शाळा, कॉलेजमधल्या वह्या पन्नाशीत, साठीत गेल्यावर उघडून पाहिल्यास ते अक्षर पाहून तुम्हालाच बरं वाटेल. असेही ते म्हणाले. तसेच आपण काय गिळणार आहोत हे फक्त डॉक्टर आणि मेडिकल मधल्या केमिस्ट यांनाच माहित असत. त्यामुळे डॉक्टरांनीदेखील चांगल्या अक्षरात औषधं लिहून द्यायला काय हरकत आहे, असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'