‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’, मनसेने बॉलिवूड कलाकारांना झापलं

blank

टीम महाराष्ट्र देशा : महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्रह्मनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक व्यक्ती सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल २०० रस्ते आणि ९४ पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्टतील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, ७० तालुके व ७६१ गावे बाधित झाली आहेत. ४,४७,६९५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या ३२, एसडीआरफच्या ३, लष्कराच्या २१, नौदलाच्या ४१, तटरक्षक दलाची १६ पथके कार्यरत आहेत. २२६ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे ४० व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर ४८ जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

दुरीकडे सगळ्या बाजूने पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरु असताना बॉलीवूड कलाकार मात्र यामध्ये कुठेही दिसत नाहीत. ज्या महाराष्ट्राच्या भूमीत मोठे झाले, गडगंज संपत्ती कमावली त्याच भूमीवर संकट आले असताना शेपूट घालून धूम ठोकलेल्या कलाकारांना मनसेने चांगलच झापलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रक जारी करुन बॉलिवूड कलाकारांनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केलं असल्यावर बोट ठेवलं आहे. ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’ असं म्हणत मनसेने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

“समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत?” असा प्रश्न मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विचारण्यात आला आहे.

‘पश्चिम महाराष्ट्रात पुराचं संकट आलं, मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार एकत्र आले. अतिशय नियोजनपूर्वक मदतसामुग्री पोहचवण्याची व्यवस्था केली. पुराचं पाणी ओसरु लागल्यावर आता खरं आव्हान आहे चिखल झालेले संसार सावरण्याचं… महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही आर्थिक स्वरुपात असेल किंवा गायींच्या चाऱ्याच्या स्वरुपात असेल, मदत रवाना केलेली आहे. समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणा बघून सगळेच भारावलेत, पण… हा ‘पण’ त्रास देतोय…’ असं मनसेने म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून जे सांगतात. ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दुःखात आहेत, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही?’

महत्वाच्या बातम्या