ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत राज ठाकरेंचे भाकीत,म्हणाले…

udhav & raj thackeray

मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. त्या तीन पक्षात कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळे राज्यातील ‘ठाकरे’च्या नेतृत्त्वाखालील सरकार फार काळ टीकेल असं वाटत नाही, असा कयास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावला आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचे सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते. यामुळे हे सरकार लवकर जाईल असं वाटते असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवलं.

कोरोनाच्या परिस्थितीत राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ही वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं.

उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीये, दिसला नाही. कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकला नाही. खासगी रुग्णालयांना सरकारकडून सवलती मिळतात तरी रुग्णांना ती नाकारू कशी शकतात? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले डब्लूएचओ…

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे