Video- देवेंद्र फडणवीस रतन खत्री कडे कामाला होते का?-राज ठाकरे

सातारा- दळभद्री राजकारण्यांनी या देशाचं वाटोळे केले आहे.सत्ता येण्यासाठी भाजप अजून किती थापा मारणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खत्री कडे कामाला होते का?’असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यात बोलताना उपस्थित केला आहे.
आज राज ठाकरे सातारा दौऱ्यावर होते यावेळी बोलताना राज यांनी भाजपवर हल्ला चढवला .

राज यांनी भाजपवर असा हल्ला चढवला
जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून, येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे. दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळे केले आहे. 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळाले, ते येण्यासाठी किती थापा मारणार. आजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल, त्याचा विचार करून पाहा. गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही दळभद्री राजकारण्यांनी या देशाचं वाटोळे केले आहे.सत्ता येण्यासाठी भाजप अजून किती थापा मारणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खत्री कडे कामाला होते का?

प्रमुख मुद्देः

  • आजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्तितीच विचार केला तर महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल त्याचा विचार करून पाहा.औरंगजेबाला शेवट पर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही.
  • महाराजांचा महाराष्ट्र आज जाती पाती मध्ये अडकलाय.दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळं केले.नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही.
  •  शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे तुमची मत मिळवण्यासाठी.महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत.
  • आत्ता असेलल केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे.नरेंद्र मोदींच्या उल्लेख गुजरातचे पंतप्रधान.30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळालं ते येण्यासाठी किती थापा मारणार.
  • देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही रतन खात्री कडे कामाला होते का
  • विकासाच्या नाववरती नुसत्या शेतकऱ्यांकडून जमिनी ओरबडल्या जातायत.
  • धर्मा पाटील तडफडतोय आणि मुख्यमंत्र्यांचे अंगावर बर्फ घेतानाचे फोटो येतात.
  • आज करमणूक म्हणून तुम्ही राजठाकरेंच भाषण ऐकत असला तर याच भविष्यात तोटा होईल.राज ठाकरे तुम्हाला भडकवत नाही, आजच्या महाराष्ट्राची सत्य परिस्तिती सांगतोय.
You might also like
Comments
Loading...