Karnataka Election : ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो ! – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : कानडी जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र विरोधकांना हा पराभव पचताना दिसत नाही. कॉंग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.

ईव्हीएम मशिनचा विजय असो एवढीच प्रतिक्रिया देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या कर्नाटका विजयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गेले काही महिने भाजपावर घणाघाती टिका करताना राज ठाकरे यांनी जर कर्नाटकमध्ये भाजपा जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज कर्नाटकमध्ये भाजपा जिंकेल असे दिसत असताना ठाकरे यांनी याचा पुनरुच्चार फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.

कॉंग्रेसने देखील याआधीच भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातल्या सर्वच पक्षांनी ईव्हीएमवर आतापर्यंत आक्षेप घेतलेला आहे, विरोधात असताना भाजपनेही आक्षेप घेतला होता, आता सर्वच पक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत, मग बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला भाजपला काय हरकत? असं कॉंग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी यांनी म्हटलं होतं.