fbpx

राज ठाकरेंनी पुण्याचा दौरा दोन दिवसातचं आटोपला !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. ठरल्याप्रमाणे हा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र राज ठाकरे यांनी हा दौरा दोनचं दिवसात आटोपला आहे. पुढच्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

या दौऱ्यात राज ठाकरे यांनी पुण्यातील विधानसभा मतदार संघांंचा आढावा घेतला. तर सबंधित मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या. यावेळी ठाकरे यांनी दोन दिवसात जवळपास 950 पदाधिकऱ्यांशी संवाद साधला. तर १५ जून नंतर पिंपरी-चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आली होती. तर पदाधिकाऱ्यांचे मोबाईल बैठक सुरु असणाऱ्या क्लब हाऊसच्या गेटवर जमा करण्यात आले होते.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा या जोडगोळी विरुद्ध जोरदार प्रचार केला होता. यावरून मनसे अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला साथ देत असल्याचे दिसून आले, मात्र विधानसभेला आघाडीकडून मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात काही वेगळी समीकरणं पाहायला मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.