आता फटाके फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

टीम महाराष्ट्र देशा: कोर्टाने अतिरेक्यांना देशात बॉम्ब फोडू नका असे सांगितले पाहिजे, तसेच हिंदूंच्या सणावरच बंदी का आणली जाते म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या गाजत असलेल्या फटाके बंदीच्या वादावर टीका केली आहे. तसेच असच झाल तर आता फटाके फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांनी दरवेळी प्रमाणे दिवाळी साजरी करावी . मात्र ज्याठिकाणी जेष्ठ नागरीक असतील अशा ठिकाणी फटाके वाजवताना काळजी घेण्याचा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. परंपरेनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांवर अशा प्रकारे बंधने येवू लागली तर सगळेच सण कायमचे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.