Share

Raj Thackeray | मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का?, राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूप गढूळ झालं आहे. त्यात निवडणुकांचं वारंही घुमू लागलं आहे.त्यामुळे सर्व पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यावर्षीच्या मनसेच्या मुंबईतील दीपोत्सव कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळीही भाजप (BJP),मनसे (MNS), शिंदे गटाच्या (Shinde Group) युतीवरून चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. तर विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. यावरून पुन्हा एकदा मनसे, भाजप, शिंदे गटाच्या युतीवरून बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे (Raj Thackeray)

राज ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना मनसे, भाजप, शिंदे गटाची युती होणार का ?, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर दीपोत्सवाचं उद्घाटन होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं यात काही गैर आहे का? उद्या मी एखाद्या फिल्म स्टारला बोलावलं असतं तर मी चित्रपट व्यवसायात जाणार असं होतं का?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.

मनसेने मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मेळाव्यांचंही आयोजन करण्यात आलं आहे.  27 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या मुंबईच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच,  या मेळाव्यानंतर 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी मी कोकणाच्या दौऱ्यावर जाणार. आधी कोल्हापूरला जाणार. देवीचं दर्शन घेऊन कोकणात जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या गोष्टींवर बोलताना, सध्याचं राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे. बेछुट आरोपबिरोप सुरू आहे. जी भाषा वापरली जातेय, ती खालच्या थराची आहे. असं राजकारण मी महाराष्ट्रात यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. दुर्देव. दुसरं काय बोलणार, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Raj Thackeray | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूप गढूळ झालं आहे. त्यात निवडणुकांचं वारंही घुमू लागलं आहे.त्यामुळे सर्व पक्ष …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now