कोणाला वाटलं असेल यांच्या तडाख्यातून सुटलो तर गैरसमज करून घेवू नका; कारण सगळा बॅकलॉग भरुन काढणार

लवकरच सुरु होणार राज ठाकरेंची व्यंगचित्रांची मालिका

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुठे गेले आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. सत्ताधाऱ्यांवर कडाडून पडणारी त्यांची व्यंगचित्रेदेखील कमी झालेली दिसत आहेत. मात्र आता मागील २० दिवसांपासून घडलेल्या घटनांवरील व्यंगचित्रांचा बॅकलॉग वाढला असून लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याबद्दलची माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांत घडलेल्या घटना आपण बारकाईने पाहत होतो. त्यातील बारकावे समजून घेत होतो त्यामुळे एवढे दिवस राहिलेला व्यंगचित्रांचा बॅकलॉग भरुन काढणार आहे. मात्र ज्यांना माझ्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून वाचलो हे वाटत असेल त्यांनी अस काही समजू नये कारण ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच असल्याचही राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

काय आहे राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट

सस्नेह जय महाराष्ट्र.

बरेच दिवस आपली भेट नाही, व्यंगचित्रांतून पण आपल्याशी बोलणं झालं नाही. गेल्या वीस दिवसांत इतकं काही घडलंय की व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) जरा जास्तच वाढलाय हे मलाही मान्य आहे.
पण कोणत्याही सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष तसाच ठेवणाऱ्यातला मी नाही.

मी गोष्टी पाहत होतो, त्यातले बारकावे समजून घेत होतो. आता व्यंगचित्रांचा हा बॅकलॉग भरुन काढणार आहे.
यांच्या तडाख्यातून सुटलो असं कोणाला वाटलं असेल तर तसं काही समजून घेऊ नका. ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच.

आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल.

बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा.

आपला नम्र

राज ठाकरे.

raj thackeray fb post

You might also like
Comments
Loading...