सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर सुरु झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी स्पष्ट केली मनसेची भूमिका!

raj thackeray

मुंबई – १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपले आयुष्य संपविल्याने बॉलिवूड मध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली असून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांत ने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरीच आयुष्य संपवले होते.

यामागील कारण मात्र अस्पष्ट असून पोलीस सर्वच शंका तपासून पाहत आहेत. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांसह फॅन्स ने सोशल मिडियावर नाराजी व्यक्त करत ज्या कोणामुळे सुशांतला हे पाऊल उचलावे लागले असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड मध्ये नेपोटीजम होत असून काही बडे अभिनेते व प्रोडक्शन हाऊस हे मुद्दामुन टार्गेट करून ठराविक अभिनेता व अभिनेत्रींना डावलत असल्याचे स्पष्ट केले होते.

तर या सर्व प्रकारानंतर गेले दोन दिवस इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया मधून सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार असल्याच्या आशयाचे मीम्स शेअर केले जात होते. मात्र आता या प्रकरणावर खुद्द राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट द्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्विट मधील फोटो मध्ये राज ठाकरे लिहितात, ‘ सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूड हे अस्थिर असून अनेक वादात्मक चर्चा निर्माण होत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव काही माध्यमातून जोडले जात आहे. या सोबतच जर कोणी कलाकार या त्रासाला बळी पडत असेल किंवा अन्याय होत असेल तरशी संपर्क साधावा, अशा आशयाचे लिखाण मोठ्या प्रमाणात पसरवले गेले आहे. या प्रकरणी माझा पक्ष किंवा पक्षाचा कोणताही भाग अशा वादात्मक गोष्टीमध्ये संबंधित नसून, कृपया याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.

गुरुपौर्णिमा विशेष : भक्ती शक्ती संगम – श्री रामदास स्वामी

पहा, रिंकूला कशाची चिंता सतावतेय

लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे