माझ्या लेकरांनो त्या चिखलातून बाहेर या; जातीयवादी नेत्यांना राज ठाकरेंचे फटकारे

टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांचा राहिलेला बॅकलॉग भरून काढणार असल्याच जाहीर केल होत. याचाच भाग म्हणजे तीन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेवर मारलेले फटकारे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकला चलो रे वर व्यंगचित्रातून केलेली टीका. आज राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर असेच एक व्यंगचित्र पोस्ट केले असून यामध्ये त्यांनी जातीयवादी नेत्यांना चांगलच फटकाराल आहे.

या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज हे जातीय दंगलीच्या चिखलात अडकलेल्या जनतेला आवज देत असल्याच दाखवण्यात आल आहे. यामध्ये ‘आपण सर्व मावळ्यांना घेवून मुघलांशी लढलो! आणि आज तुम्ही सर्वजण जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी एकमेकांत का लढताय ? असा सवाल थेट शिवाजी महाराजच करत असल्याच दाखवण्यात आल आहे.

राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र फेसबुक पेजवर पोस्ट करताच तुफान व्हायरल झालय. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या जातीयवादामुळे सामन्य नागरिक चांगलेच भरडले जात असल्याच दिसत आहे. कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीपासून तर संपूर्ण महाराष्ट्राची एकोप्याची घडीच बिघडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र हे अशा प्रकारे जातीयवाद निर्माण करणाऱ्यांना चांगलीच चपराक आहे.

Loading...

4 Comments

Click here to post a comment