राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला करमणुकीची गुढी उभारली- राम कदम

raj thakrey and ram kadam

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी मोदी मुक्त भारताची घोषणा केली तसेच भाजप सरकारसह प्रसारमाध्यमांवरही टीकास्त्र सोडले होते. यावरून भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंवर टीका करत गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी करमणुकीची गुढी उभारली, सुट्टीच्या दिवशी जमलेल्या नागरिकांची चांगली करमणूक झाली. अशी खिल्ली राम कदम यांनी उडवली.

राज ठाकरे यांनी काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राम कदम यांनी त्या भेटीवर देखील टीका केली. पवारांकडून नीट धडे घेतलेले दिसत नाही, असा टोमणा कदम यांनी मारला.