fbpx

राज ठाकरेंच हटके बर्थडे सेलिब्रेशन, चक्क कापला ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांचा ५१ वा वाढदिवस शुक्रवारी पार पडला, आपल्या नेत्याच्या वाढदिवसाला मनसे कार्यकर्त्यांनी चक्क १ किलोचा ईव्हीएम केक आणला होता, राज ठाकरे यांनीही ईव्हीएमला विरोध दर्शवणारा केक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कापला.

राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचे कार्यकर्ते कृष्णकुंजवर दाखल झाले होते. सोशल मिडीयावर देखील त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

राज ठाकरे हे काल पत्नीसह सिद्धिविनायक मंदिरात गेले होते. तिथे गणपतीबाप्पापुढे राज ठाकरे नमस्तक झाले. दरम्यान कार्यकर्त्यांनी आणलेला ५१ किलोंचा ईव्हीएम केक सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.