पुढील ८ महिन्यात देशातील हुकूमशाही संपुष्ठात येईल; राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

चिपळूण – भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मोदींवर घणाघाती टीका केलीये. आता केवळ ७ – ८ महिन्यात भाजपचा पराभव होऊन, देशातील हुकूमशाही संपुष्ठात येणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. ते चिपळूणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एक माणूस खोटं बोलून देशाला फसवतो हे आता लोक खपवून घेणार नाहीत, आतापर्यंत जनतेच्या हातात केवळ आश्वासनाशिवाय दुसरं काहीच पडलं नाही. दरम्यान आज केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा देत मोदी सरकार आणि भाजपा हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करतंय. तर, विरोधक हा दिवस ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहेत.