fbpx

ब्रेकिंग : राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले आहेत. ते महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाले, महापौर बंगला, क्रीडाभवन यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या शिक्षकांचीही राज ठाकरे भेट घेणार आहे. दुपारी ते आझाद मैदानात दाखल होतील असे समजते आहे. आज सायंकाळी ५ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या सभागृहात रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांच्या चित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून या कार्यक्रमालादेखील राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.