कट्टर शत्रू असणारे उत्तर आणि दक्षिण कोरीया चर्चा करतात, मग आपण का नाही ? – राज ठाकरे

मुंबई: भारत – पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युद्धापेक्षा चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चर्चेतून मार्ग काढण्याची मागणी केली आहे. उत्तर कोरीया आणि दक्षिण कोरीया हि दोन शत्रू राष्ट्रे चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही ? असा सवाल राज ठाकरे देखील केला आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारे नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे, ते देखील निष्ठुरपणे. म्हणून युद्ध किवा युद्धजन्य परस्थिती निर्माण करून राजकीय फायदा पण कोणी घेवू नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा. अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलेलं निवेदन