ब्रेकिंग: तर ठरल मग मनसे-राष्ट्रवादी आगामी निवडणुका एकत्र लढवणार!

१ एप्रिल: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील सख्य मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. कधीकाळी एकमेकांवर टीका करणारे दोन्ही नेते आता गोडवे गाताना दिसत आहेत. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासुन सुरु होत्या, अखेर आज १ एप्रिलच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी येणाऱ्या सर्व निवडणुका दोन्ही पक्ष आघाडीकरून लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

bagdure

राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. मुलाखतीनंतर राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेटसुद्धा घेतली होती. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन्ही दिग्गज एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती, तसेच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील या आघाडीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनतेची भावना लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये केली . तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार असल्याच देखील त्यांनी स्पष्ट केल आहे.

दरम्यान, आपण दोन्ही नेत्यांचे समर्थक असाल तर ते हे घडावं अशीच आपलीं मनोकामना आहे, मात्र आज १ एप्रिल असल्याने नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. कारण आहे अर्थातच ‘एप्रिल फूल’ चे. सो डोण्ड टेक इट सिरिअसली. बी अ कुल… आणि हो भविष्यात खरोखर असं काही घडलं तर तो योगायोग समजावा

You might also like
Comments
Loading...