तर मी त्याचा खून करेल – राज ठाकरे

raj-thackeray

पुणे: आजकाल लोक डोळ्याने कमी आणि मोबाईलने जास्त पाहतात. जिकडे जाईल तिकडे मोबाईलवर फोटो काढायची गडबड करतात. कुठेही गेलं कि काही पाहता येत नाही. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटून एक खून माफ करण्याची परवानगी मागेल आणि मोबाईल निर्माण करणाऱ्याचा खून करेल म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईलवर फोटो काढणाऱ्यांना चांगलच सुनावलं आहे. पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागातील विविध विकास कामाचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील मनसे नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचा उदघाटन कार्यक्रम पार पडला. नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागातील उद्यानाच्या उदघाटनावेळी ते फिरून पाहण्याची राज यांची इच्छा होती. मात्र, कार्यक्रमाला आलेल्या तरुणांनी फोटो काढण्यासाठी एकच गराडा केला त्यामुळे त्यांना उदयान पाहता आले नाही. त्यामुळे पुढीलवेळी कोणालाही न सांगता मला बोलवा असा आदेशच राज ठाकरे यांनी दिला.

Loading...

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, निवडणुक आली कि आमचे नगरसेवक वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला गेला. कचऱ्यासंदर्भात माझ्या नगरसेवकांनी चांगली काम केली पण त्यांना मतदान होत नाही, त्यामुळे बागेत आले आणि बोलून गेले असे होयला नको. असचं चालत राहील तर काम कोण करणार. आपण आजवर जे जे बोललो ते घडत जात असल्याचही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, मला जे काही बोलयेच आहे ते सायंकाळी वांद्रयात बोलणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगिलते आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद