पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शरद पवार एकाच मंचावर

sharad pawar and raj thackeray

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महामुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. यावेळेस निमित्त आहे ते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे. १३ जूनपासून ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होईल. तर शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. तर 15 जूनला होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८ व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या होत्या.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...