राज ठाकरे राहुल गांधींची घेणार होते भेट, पण …

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे, तसतसं राजकीय घडामोडींना वेग येत आहे. राहुल गांधी हे पप्पू नसून परम पूज्य झाले आहेत असे स्तुतीसुमने उधळणारे राज ठाकरे आता थेट राहुल गांधी यांच्या भेटीला जाणार होते.मात्र एका कार्यक्रमामुळे ही भेट रद्द झाली आहे. देशातील प्रमुख नेत्यांना अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते दिल्ली दौरा करणार होते.

नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयात किंवा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट प्रस्तावित होती.पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांची जाहीर भाषणात स्तुती केली होती. भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तरं दिली होती. राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना एक प्रकारे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती.

दरम्यान,मुंबईत एका कार्यक्रमात व्यस्त असल्यामुले त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...