fbpx

भुजबळ, राज ठाकरे भेटीने पुढे सरकले राष्ट्रवादी – मनसे युतीचे इंजिन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक कारणासाठी घेतल्याचा दावा केला जात असला तरीही या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेला महाआघाडीत समावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्रात तर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. मनसेने राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा मागितल्याची चर्चा असताना भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट हा चर्चेचा विषय बनली आहे.