fbpx

राज ठाकरेंचा पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना टोला

raj thakare vr narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केल आहे. नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या योजना कश्या फसव्या आहेत हे त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

raj thakare

अहो, कधीतरी आमच्याही छकुल्याच कौतुक करा, ना! असे नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बोलत असल्याचे दर्शविले आहे. त्यावर मनमोहन सिंग म्हणतात, मोदिजी नक्की केले असते पण त्यात फक्त पेंढा भरलाय, अशी शब्दांची किमया करून राज ठाकरेंनी व्यंग्यचित्र रंगवले आहे. देशाच्या प्रगतीमध्ये आजवरच्या सरकारचा ‘हात’ आहे, असे मी अभिमानाने कबूल करतो. लाल किल्ल्यावरुन देखील मी असे सांगितले आहे, अशा शब्दांत काँग्रेसला विकासाचे श्रेय देत काँग्रेस माझ्यासारखा उदारपणा दाखवणार का? असा प्रश्न मोदी उपस्थित करत असल्याचा उल्लेख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केला आहे.

यापूर्वी सुद्धा राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती

raj thackeray fb cartoon