माझ्यामुळेच सर्व मोदीविरोधक एकत्र आले, राज ठाकरेंचा दावा

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रथम मी गेअर टाकल्यामुळे सगळे विरोधक एकत्र आल्याचा अजब दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. रत्नागिरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

गुढीपाडव्याला झालेल्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले होते, असे त्यांनी सांगितले. विरोधकांची एकजूट गरजेची असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले.

दरम्यान कालही राज ठाकरे यांनी कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाणारवरून सरकारवर निशाणा साधला होता. तर आज नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे खोटे बोलणाऱ्यांचे काय करायचे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला शिवसेनेसह मनसेचा देखील विरोध आहे.