मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर आम्ही मशिदींसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर ॲड.असीम सरोदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
भारतातील कुठल्याच न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा हा निर्णय कधीच दिलेला नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भातील न्यायालयाचा निर्णय दाखवावा असे जाहीर आव्हान त्यांनी यावेळी राज ठाकरेंना दिला आहे