सचिन वाझेमुळेच राज कुंद्राची अटक पाच महिन्यांपासून पडली होती लांबणीवर 

सचिन वाझे

मुंबई – पॉर्न फिल्म निर्मिती केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता असा आरोप होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक करण्याची तयारी फेब्रुवारी महिन्यातच केली होती. परंतु सचिन वाझे याच्यामुळे राज कुंद्राची अटक लांबली. याच काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. तसेच मनसुख हिरेन प्रकरण देखील समोर आले आणि त्यामुळे पोलिसांचे लक्ष या प्रकरणाकडे लागलं होतं.दरम्यानच्या काळात  एँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांवर अनेक स्तरातून टीका झाली.

त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांच्याजागी हेमंत नगराळे यांना आयुक्तपदाची जबाबदारी दिली. नवीन आयुक्त आल्यानंतर त्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली. यात राज कुंद्रा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही बदली झाली. मुंबई पोलीस दलात झालेल्या बदलामुळे साक्षीदार आणि पुरावे असूनही राज कुंद्राच्या अटकेसाठी ५ महिन्याचा कालावधी लागला. राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली कोर्टात हजर केले. त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. क्राईम ब्रान्चच्या पथकाने मंगळवारी राज कुंद्राला भायखळा जेलमध्ये पाठवले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP