महाराष्ट्र देशा डेस्क : गेल्या वर्षी एका पोर्नोग्राफी केस प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला व्यावसायिक आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, राजने मुंबईत ‘UT No 69’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मुंबईतील मीरा रोड येथील डब्बा फॅक्टरी या शूटिंग लोकेशनवर या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता. आर्थर रोड जेलच्या ज्या बॅरेक्स (कैद्यांची रूम) मध्ये राजला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते, त्यावरून चित्रपटाचे शीर्षक ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असुन आता चित्रपटाचे हक्क OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर विकण्याची तयारी सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले आहे की, ‘राज कुंद्राने चित्रपटात स्वत:चीच भूमिका साकारली आहे. आर्थर रोड तुरुंगाच्या आतील गोष्टी आणि त्याच्याबरोबर तिथे काय काय घडले, हे चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आले आहे. चित्रपटात इतर कोणतेही मोठे कलाकार सहभागी नाहीत. त्यामुळेच चित्रपटाच्या शूटिंगबाबत फारशी चर्चा झाली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज अली यांनी केले असून कला दिग्दर्शन नीरज कुमार सिंग यांनी केले आहे.
राज कुंद्राचे पॉर्न रॅकेट कनेक्शन
गेल्या वर्षी राज कुंद्रावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासह 10 जणांना आरोपी ठरवले होते. या सर्वांविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. राजच्या अटकेपूर्वी या प्रकरणात आणखी 5 जणांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी नवीन मॉडेल आणि अभिनेत्यांना चित्रपटांमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करायचे आणि त्यांच्यासोबत अश्लील चित्रपट बनवायचे. मड आयलंड आणि मालाडमध्ये भाड्याने घेतलेल्या बंगल्यांमध्ये या चित्रपटांचे शूटिंग करण्यात येत होते.
राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते कि, विविध मॉडेल्स आणि कलाकारांना न्यूड सीन शूट करण्यास सांगितले जायचे. जर कोणी नकार दिल्यास त्यांना धमकावले जात होते. त्यांनतर हे व्हिडीओ क्लिप एका अॅपवर अपलोड केले जात होते. हे अॅप इन्स्टॉल करण्यासाठी आणि कंटेंट पाहण्यासाठी प्रेक्षकांना ठराविक रक्कम द्यावी लागत होती.
महत्वाच्या बातम्या:
- Vijay Shivtare on Sanjay Raut | “वैद्यकीय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग…” ; विजय शिवतारेंचा संजय राऊतांवर घणाघात
- Sambhajinagar : टाटाचे पहिले पाऊल! क्रोमा वर आता औरंगाबाद नव्हे तर ‘संभाजीनगर’
- Vijay Salvi | “उद्धव ठाकरे यांच्या समोरच एकनाथ शिंदेंचा फोन आला होता, मात्र…”; विजय साळवींचा खुलासा
- Vijay Shivtare : “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार मीच…”, विजय शिवतारेंचा शिवसेनेला टोला
- Uddhav Thackeray | पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष शिंदे गटात सामील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<