‘राज कुंद्रा हा तर एक भला माणूस आहे’, राखी सावंतची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी यावर आपले मत मांडले आहे, यातच आता  बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतने देखील यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत राखी सावंत म्हणाली की, ‘ बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीने नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिचं नाव खराब करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे. राज कुंद्रा एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज कुंद्रा असं काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाही,’ असे मत राखी सावंतने व्यक्त केले आहे.

तर पुढे ती म्हणाली, ‘राकेश रोशन यांचं ‘क्रेझी 4’ मधलं ‘तुझे टुक देखे’ या आयटम साँगसाठी सुरूवातीला शिल्पा शेट्टी ऑफर आली होती. जेव्हा तिने मला सांगितलं की हे गाणं तिला नाही करायचं त्यावेळी ते गाणं मला देण्यासाठी सांगितलं. त्यानंतर शिल्पा शेट्टीने राकेश रोशन यांना माझं नाव सुचवले होते’, असेही राखी शिल्पाची बाजू घेत म्हणाली आहे.

राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला काल सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP