बिटकॉईन प्रकरणी राज कुंद्राची चौकशी

मुंबई : बिटकॉईन प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलेत.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या प्रकरणात मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित भारद्वाजनं राज कुंद्राचं नाव उघड केल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

राज कुंद्राला बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. बिझनेसमन असलेला राज कुंद्रा ईडी कार्यालयासमोर हजर झालाय आणि त्याच्या चौकशीला देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान कुंद्रा याच्या चौकशीत आणखी काही लोकांची नावे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये.

You might also like
Comments
Loading...