नाराज जयदत्त क्षीरसागर पुन्हा राष्ट्रवादीच्या स्टेजवर

पुणे: आमदार जयदत्त क्षीरसागर हे स्व:पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जातं आहे, मध्यंतरी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. मात्र, आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर आले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना झुकते माप दिले जात असल्याने क्षीरसागर हे नाराज आहेत. यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

एवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस आणि क्षिरसागर यांनी मुंबई ते बीड एकत्र प्रवास देखील केला होता. तसेच पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन क्षीरसागर यांच्या घरीही देखील गेल्या होत्या. त्यामुळे क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचं बोललं जातं होत. मात्र आज आमदार जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या स्टेजवर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.