राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसे है? राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है? ; मै हिंदी पिक्चर बहुत देखता हूँ इसिलिये! हा संवाद आज रंगला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात.राज ठाकरे आज वाढीव वीजबिलांसंदर्भात राज्यपालांना भेटले होते, त्यावेळी राज्यपालांनी राज यांच्या चांगल्या हिंदी विषयी प्रश्नावर राज ठाकरेंनी असे दमदार उत्तर दिले असल्याची बातमी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिली आहे.

सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली आहे.

तसेच कुंथत – कुंथत कधीच सरकार चालत नाही, हे कशासाठी इतके कुंथत आहेत, तेच मला कळत नाही, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

रस्त्यावर सगळीकडे वाहतूक सुरु आहे, पण रेल्वे सेवा सुरू नाही. रेस्टॉरंट, हॉटेल सुरू आहेत. पण मंदिरं खुली करण्यास परवानगी नाही. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या