राज स्वतःच ‘रोजगारमुक्त’ ; माधव भंडारी यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

टीम महाराष्ट्र देशा : ‘‘ज्यांचा एकच आमदार आहे, ज्या मुंबई महापालिकेत ते मालक असल्यासारखे वागतात, तिथे एकही नगरसेवक नाही. ज्यांच्या विचारावर एकही माणूस निवडून येऊ शकत नाही, अशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच रोजगारमुक्त केले आहे. त्यांच्याकडून मोदीमुक्त भारताचा नारा म्हणजे यापेक्षा मोठा विनोद नाही अशी बोचरी टीका भाजपचे राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे. एका कार्यक्रमासाठी श्री. भंडारी कोल्हापुरात आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईत अप्रेंटिस उमेदवारांनी एल्गार पुकारल्यानंतर आज मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्ली गाठली. अप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्यांचा पाठपुरावा मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांकडे केला. आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलकांनी काल मुंबईत साडेतीन तास रेल्वेरोको केला होता. त्यानंतर मनसेनं विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतल्याचं चित्र आहे.