‘उद्धवा अजब तुझे सरकार; देशमुख फरार, परमबीर सिंगही फरार लवकरच..’

kirit somayya

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या सतत राज्य सरकारवर निशाना साधत असतात. ठाकरे सरकारमधील नेत्यांची भ्रष्टाचार प्रकरणे किरीट सोमय्या सतत जनतेसमोर आणत आहेत. त्यांनी याप्रकरणी सरकारवर निशाना साधण्याचा एकही चान्स सोडलेला नाहीये. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारवर बाण नेमला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे परीवन मंत्री अनिल परब तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचार आरोप प्रकरणावर त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने कित्येकदा समन्स बजावूनही ते एकदाही हजर राहिलेले नाहीयेत. त्यामुळे अनिल देशमुख फरार असल्याचा आरोप भाजपने केला. त्यामुळे त्यांचा शोध सुरु आहे. त्याचप्रकारे परमबीर सिंग यांचाही आता सीबीआयने शोध सुरु केला आहे. देशमुख , सिंग यांच्यानंतर आता अनिल परब यांचाही शोध करावा लागणार कारण तेही फरार होणार आहेत, असे भाजपचे किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे. उद्धवा अजब तुझे सरकार, गृहमंत्री अनिल देशमुख फरार, पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार
पुढे अनिल परब होणार’ असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या