नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान अद्याप सुरूच आहे. पावसाशी संबंधित घटनांमुळे मृत्यू झालेल्या राज्यातल्या एकंदर मृतांची संख्या 35 झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कुमाऊ भागालाच बसला आहे. मदत आणि बचावकार्य इथं वेगानं सुरू आहे.
या कार्यासाठी इथं लष्कर, आय.टी.बी.पी, एस.डी.आर.एफ, एन.डी.आर.एफचे पथकं तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांच्याशी संवाद साधला आणि राज्यातल्या मदतकार्याची आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.
दरम्यान, केरळमध्ये पावसाचा जोर अजून कायम आहे. शनिवारपर्यंत राज्यात पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी इशारा देण्यात आला आहे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या आणि नद्यांजवळच्या भागांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधल्या अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रहारमधून आव्हान
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र