कोल्हापूरात पावसाचा हाहाकार ; NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूरला रवाना

kolhapur

कोल्हापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धूमशान पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने कोल्हापूरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत.

पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूर शहरासाठी एक तर शिरोळसाठी एक टीम रवाना झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सकल भागात पुराच पाणी साचलंआहे. दुपारपर्यंत NDRF च्या टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. कोल्हापूरात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

तर पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी गुरुवारी सकाळी ३५ फुटांपर्यंत आली होती. पंचगंगेची धोक्यांची पातळी ३९ फूट आहे. त्यामुळे कोल्हापूरात पावसाचा कहर असाच सुरु राहिला तर संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा कोल्हापूरला भीषण महापुराचा फटका बसू शकतो. अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP